डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रविरामाची घोषणा, इराणकडून मात्र प्रतिसाद ‘नाही’!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली, परंतु इराणने हा दावा फेटाळला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, कोणताही शस्त्रविराम करार झालेला नाही. इराणने केवळ स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले आहे आणि इस्रायलने हल्ले थांबवले तरच इराणही प्रत्युत्तर देणार नाही. इराणच्या वृत्तसंस्थांनीही शस्त्रविरामाचं वृत्त नाकारले आहे.