नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “ऑपरेशन सिंदूर राबवून २२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला आपण घेतला”
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाषणात ऑपरेशन सिंदूर हा भारताचा विजयोत्सव असल्याचे सांगितले. त्यांनी दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा उल्लेख करत, २२ एप्रिलच्या हल्ल्यानंतर बदला घेण्याचा संकल्प केला होता असे म्हटले. मोदींनी भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचे कौतुक केले आणि पाकिस्तानच्या अणुशक्तीच्या धमकीला खोटं ठरवलं असल्याचे सांगितले.