निकी हॅले यांचं वक्तव्य; “चीनला सूट देऊन अमेरिकेने भारताशी हितसंबंध बिघडवू नये, अन्यथा..”
रिपब्लिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या नेत्या निकी हॅले यांनी अमेरिकेने चीनला सूट देऊन भारतासारख्या बळकट सहकारी देशाशी व्यावसायिक हितसंबंध बिघडवू नयेत, असे वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल घेऊन नफा कमावण्याचा आरोप केला होता. हॅले यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा सल्ला दिला, परंतु चीनला टॅरिफपासून सूट देणे चुकीचे असल्याचे म्हटले.