“भारतात बलात्कार, गुन्हेगारी आणि दहशतवाद…”; अमेरिकन नागरिकांसाठी सूचना सूची
अमेरिकेच्या US Department of State ने त्यांच्या नागरिकांसाठी भारत दौऱ्याबाबत सूचना सूची प्रसिद्ध केली आहे. यात भारतातील वाढती गुन्हेगारी, बलात्कार, दहशतवाद याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः महिलांनी एकट्याने प्रवास टाळावा. जम्मू काश्मीर, भारत-पाकिस्तान सीमाभाग, माओवादी प्रभाव असलेले भाग, मणिपूर आणि उत्तरपूर्व भारतातील काही राज्ये धोकादायक ठरू शकतात. भारतात कायद्यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.