रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढल्या, ईडी आरोपपत्रात ५८ कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा ठपका
प्रियांका गांधींचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीच्या चार्जशीटमध्ये वाड्रांवर ५८ कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा आरोप आहे. या पैकी ५ कोटी ब्लू ब्रीज ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि ५३ कोटी स्काय लाइट हॉस्पिटालिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आले. या कंपन्यांवर आधीच गुन्हे असल्याने वाड्रांच्या अडचणी वाढल्या आहेत.