गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचा व्हिडीओ, म्हणाली; “मी आणि माझ्या मुली जंगलात…”
कर्नाटकातील गोकर्ण येथील जंगलात नीना कुटीना (४०) नामक रशियन महिला तिच्या दोन मुलींसह आठ वर्षांपासून राहत होती. पोलिसांनी तिला सुरक्षित स्थळी नेले. नीनाने सांगितले की, त्या जंगलात राहून निसर्गाचा आनंद घेत होत्या. तिचा व्हिसा २०१८ मध्ये संपला होता. सध्या तिला कारवार येथील आश्रमात ठेवण्यात आले असून तिला रशियात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.