“गुहेत सापडलेल्या रशियन महिलेला मायदेशी पाठवण्यासाठी..” ; काय म्हणाले कायदेशीर तज्ज्ञ?
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यातील जंगलात आठ वर्षांपासून राहणारी रशियन महिला नीना कुटीना पोलिसांना आढळून आली. तिला सोडवण्यात आलं आहे. तिचा व्हिसा २०१७ मध्येच संपला होता. नीना तिच्या दोन मुलींसह गुहेत राहात होती. पोलिसांनी तिला आणि तिच्या मुलींना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. तिला मायदेशी पाठवण्यासाठी निधीची आवश्यकता लागू शकत असं कायदेशीर तज्ज्ञांनी म्हटलं आहे.