पाकिस्तानातील प्रसिद्ध इन्फ्लुअन्सरची राहत्या घरात हत्या
इस्लामाबादमध्ये प्रसिद्ध इन्फ्लुअन्सर सना युसूफची तिच्या घरी गोळीबार करून हत्या करण्यात आली. तिच्यावर जवळून गोळ्या झाडून हल्लेखोर पळून गेला. पोलिसांनी तपास सुरू केला असून ऑनर किलिंगसह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. सोशल मीडियावर #JusticeForSanaYousuf ट्रेंड होत आहे. सना दैनंदिन जीवनशैली, चित्राल संस्कृती, महिला हक्क आणि शिक्षण यावर व्हिडिओ बनवत असे.