सोनम रघुवंशी राजाच्या हत्येनंतर ज्या इमारतीत राहिली होती तिथल्या वॉचमनलाही अटक
राजा रघुवंशीच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. सोनम रघुवंशीने हत्या केल्यानंतर इंदूरमधील फ्लॅटमध्ये लपल्याच्या प्रकरणात पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स आणि वॉचमन बलवीर अहिरवरला अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सात झाली आहे. सिलोमकडे सोनमने दिलेली पेटी जाळल्याचे आढळले, परंतु त्यातील वस्तूंचा तपास सुरू आहे. मेघालय पोलिसांनी या मोहिमेला ऑपरेशन हनिमून असे नाव दिले आहे.