“आई-मुलीचा एकच प्रियकर आणि…”, तेलंगणाच्या ‘सोनम रघुवंशीने’ ‘या’ कारणामुळे केली पतीची हत्या
तेलंगणातील कुरनूल येथे ऐश्वर्याने तिच्या प्रियकर तिरुमल रावच्या मदतीने पती तेजेश्वरची हत्या केली. ऐश्वर्याने सुपारी किलर्सच्या मदतीने ही हत्या घडवून आणली. तेजेश्वर बेपत्ता झाल्याची तक्रार १७ जून रोजी दाखल झाली होती. २१ जूनला त्याचा मृतदेह सापडला. तपासात ऐश्वर्या आणि तिच्या आईचा तिरुमल रावशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. तिरुमलने तीन सुपारी किलर्सच्या मदतीने तेजेश्वरची हत्या केली.