भर रस्त्यात महिलेला मारहाण, लैंगिक छळ, शिवीगाळ; कुठे घडली घटना?
बंगळुरुमध्ये रविवारी एका महिलेला भर रस्त्यात मारहाण आणि लैंगिक छळ करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रेणुका यल्लमा लेआऊट भागात घडलेल्या या घटनेत पुरुषांच्या जमावाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि विरोध केल्यावर मारहाण केली. स्थानिक लोकांनी तिला वाचवले. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे.