“आता सगळं जग मला खुनी म्हणेल..”, हुंडाबळी प्रकरणी गजाआड झालेल्या पतीची पोस्ट व्हायरल
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात पतीने हुंड्यासाठी पत्नी निक्कीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. निक्कीचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये विपिनसोबत झाला होता. निक्कीच्या बहिणीने सासरच्या लोकांवर ३६ लाख रुपयांच्या मागणीचा आरोप केला आहे. विपिनने निक्कीने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी विपिनला अटक केली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.