“आम्ही जर तिसरा डोळा उघडला तर…”, अमेरिकेच्या टॅरिफ वाढीनंतर शिवराज सिंह चौहान यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे, ज्यामुळे एकूण टॅरिफ ५० टक्के झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अमेरिकेला इशारा दिला की, भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही. त्यांनी भारतीय नागरिकांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आणि भारत कुणासमोरही झुकणार नाही, असे ठामपणे सांगितले.