रशियाच्या नावानं भारताला डिवचणाऱ्या ट्रम्पना रशियाचंच उदाहरण देत प्रत्युत्तर!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे, कारण भारत रशियाकडून तेल आयात करतो आणि त्याचा नफा कमावतो. युक्रेन युद्धामुळे रशियाकडून तेल आयात करण्याची गरज निर्माण झाली, असे भारताने प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, युरोप आणि अमेरिका देखील रशियाकडून कच्चा माल आयात करतात, त्यामुळे भारतावर टीका करणे अनुचित आहे.