भारत-पाकिस्तान शस्त्रविरामाच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली?
१० मे रोजी संध्याकाळी ५:३३ वाजता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रविरामाची घोषणा केली. यापूर्वी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पाकिस्तानला मान्य होईल असा तोडगा काढण्याचा दबाव आणला होता. मात्र, मोदींनी स्पष्ट भूमिका घेतली. पाकिस्तानने ड्रोन हल्ले केल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले. अखेर, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे नव्हे तर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान नरमले.