भारतानं पाकिस्तानला सुनावलं; “दरवर्षी आपल्या दुर्दैवाने…”, संयुक्त राष्ट्रांत केलं लक्ष्य!
भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानच्या सईमा सलीम यांनी काश्मिरी महिलांवरील अत्याचारांबाबत केलेल्या विधानांचा भारताने निषेध केला. भारताचे प्रतिनिधी पर्वतानेनी हरीष यांनी पाकिस्तानच्या आरोपांना अवास्तव बडबड म्हणून फेटाळले. त्यांनी १९७१ च्या Operation Searchlight दरम्यान पाकिस्तानी लष्कराने केलेल्या अत्याचारांची आठवण करून दिली, ज्यात ४ लाख महिलांवर बलात्कार झाल्याचा दावा आहे.