सोनम आणि राजा रघुवंशी यांचा बेपत्ता होण्यापूर्वीचा व्हिडीओ समोर
इंदूरहून शिलाँगला मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला असून, त्याची पत्नी सोनम अद्याप बेपत्ता आहे. गाईड अल्बर्टने दिलेल्या माहितीनुसार, राजा आणि सोनमसोबत तीन जण होते. सोनमच्या भावाने तिचं अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. राजा आणि सोनम २३ मे पासून बेपत्ता होते. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सोनमचा शोध घेतला जात आहे.