“इराण कधीही शरणागाती पत्करत नाही, आमचा इतिहास..”; खामेनी यांची पोस्ट चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली, परंतु इराणने हा दावा फेटाळला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शस्त्रविराम झाल्याचे नाकारले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इराण कधीही शरणागती पत्करत नाही असे म्हटले. इस्रायलने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शस्त्रविरामाबाबत इस्रायलने इराणकडून हल्ले न झाल्यास युद्धबंदी मान्य असल्याचे सांगितले.