रेल्वेची ऑनलाईन तिकीटं होतात काही सेकंदांत फुल्ल; ‘या’मुळे तुम्ही राहता वेटिंगवर!
IRCTC ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. 'ब्रह्मोस', 'टेस्ला', 'अॅव्हेंजर्स' नावाच्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्सद्वारे काही सेकंदांत कन्फर्म तिकीट मिळवले जातात, ज्यामुळे सामान्य प्रवासी वंचित राहतात. या प्रणालींमध्ये प्रवाशांची माहिती आधीच नोंदवली जाते आणि बुकिंग प्रक्रियेतून काही सेकंदांत तिकीट मिळते. आरपीएफने यावर लक्ष ठेवून अनेकांवर कारवाई केली आहे.