ट्रम्प यांना इस्रायल-इराण संघर्षात शस्त्रसंधी नकोय; पत्रकारांना म्हणाले, “अण्वस्त्र…
गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल-इराण संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणला जबाबदार धरले असून जी-७ देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनला परतत संघर्षावर भाष्य केले. त्यांनी शस्त्रसंधीपेक्षा संघर्षाचा पूर्णविराम हवा असल्याचे सांगितले. अमेरिका इस्रायलच्या पाठिशी असून इराण अण्वस्त्र बाळगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उच्चपदस्थ व्यक्तींना मध्य-पूर्व आशियात पाठवून चर्चेतून तोडगा काढण्याचे संकेत दिले.