Jagannath Puri इस्कॉनच्या रथयात्रांवर पुरीच्या जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचा आक्षेप कशासाठी?
पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने इस्कॉनवर भगवान जगन्नाथाच्या स्नान यात्रा व रथयात्रा मनमानी पद्धतीने आयोजित केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी इस्कॉनला धर्मशास्त्रांचे उल्लंघन केल्याबद्दल १०० पानी पत्र पाठवले आहे. इस्कॉनने हवामान आणि स्थानिक परिस्थितींचा हवाला देत आपल्या वेळापत्रकाचे समर्थन केले आहे. प्रशासनाने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला असून सामंजस्याने प्रश्न सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.