ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफची चिंता नको; ख्रिस्तोफर वूड यांचा सल्ला!
गेल्या चार महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफची चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आणि नंतर ५० टक्के टॅरिफ लागू केले, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत नकारात्मक परिणाम दिसून आला. अमेरिकेतील वित्तविषयक कंपनी जेफरीजचे ख्रिस्तोफर वूड यांनी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर्स विकण्याऐवजी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, कारण हे टॅरिफ तात्पुरते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.