दत्तक मुलानं पैशांसाठी केला आईचा खून; धर्मग्रंथांचा उल्लेख करत न्यायालयानं सुनावली फाशी
मध्य प्रदेशमध्ये दत्तक मुलाने आपल्या आईचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी दीपक पचौरीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दीपकने पैशांच्या वादातून आई उषादेवीचा खून केला. न्यायाधीश एल. डी. सोलंकी यांनी धर्मग्रंथांचा उल्लेख करत मातृहत्या पाप असल्याचे सांगितले. दीपकने आईचा खून केल्यामुळे त्याला भारतीय दंड विधान कलम ३०२ नुसार फाशीची शिक्षा देण्यात आली.