पत्नीला बॉयफ्रेंडसह पाहिल्यानंतर चिडलेल्या पतीने चावलं नाक, कुठे घडली ही घटना?
उत्तर प्रदेशातील हरियावान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम खिलवानने पत्नीला प्रियकरासह पाहिल्यावर संतापाच्या भरात तिचं नाक चावलं. या घटनेत पत्नी जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाली. पोलिसांनी राम खिलवानला अटक केली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नरेंद्र कुमार यांनी या प्रकरणाचे इतर पैलू तपासत असल्याची माहिती दिली.