कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र आहेत? भारत व पाकिस्तान कितव्या स्थानी? ९ देशांची यादी!
इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. इस्रायलने इराणच्या आण्विक व लष्करी तळांवर हल्ले केले, तर इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हवाई हल्ले केले. SIPRI च्या अहवालानुसार, जगभरात ९ देशांकडे एकूण १२,२४१ अण्वस्त्रे आहेत. रशियाकडे सर्वाधिक ५,४५९ अण्वस्त्रे असून, भारताकडे १८० व पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत.