“प्रिय डोनाल्ड…”, NATO प्रमुखांनी पाठवलेला खासगी संदेश ट्रम्प यांनी केला जगजाहीर!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी ट्रम्प यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यांच्या निर्णायक कारवाईचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी हा मेसेज जगजाहीर केला आहे. युरोपला मोठी किंमत चुकवावी लागेल, असे रुट यांनी नमूद केले आहे. हा मेसेज सिग्नल अॅपवरून पाठवला असण्याची शक्यता आहे.