नेपाळमध्ये Gen Z संतप्त; FB, Insta, X वर सरकारची बंदी, हजारोंच्या संख्येनं उतरले रस्त्यावर
सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हजारोंच्या संख्येनं Gen Z युवकांनी सरकारच्या २६ लोकप्रिय सोशल मीडिया साईट्स बॅन करण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शनं केली. या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही युवक जखमी झाले. त्यामुळे न्यू बनेश्वरजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या कारवाईचाही युवकांनी निषेध केला.