“…त्यांचा धंदा मारल्यामुळे माझ्याविरोधात अपप्रचार”, इथेनॉलवरील आरोपांना गडकरींचं उत्तर
केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतल्यावर विरोधकांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने आरोप केला की गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांना याचा फायदा होतोय. गडकरी यांनी हे आरोप फेटाळले आणि सांगितले की त्यांनी कधीही खोटी कामं केली नाहीत. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आणि जीवाश्म इंधनावरचा खर्च कमी होतो.