डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका? गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला नोकरभरती संदर्भात दिला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' या घोषणेअंतर्गत विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्यांनी ॲपलसह इतर कंपन्यांना अमेरिकेतच कारखाने थाटण्यास सांगितले. आता त्यांनी गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आयटी कंपन्यांना भारत, चीन सारख्या देशांतील नोकरभरती कमी करून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.