ऐन सणासुदीत केरळमध्ये मद्यपींनी रिचवली ८२६ कोटींची दारू!
केरळमध्ये ओणम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी ओणम सणाच्या काळात ८२६ कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.३८% ने वाढली आहे. केरळ स्टेट बेवरेजेस कॉर्पोरेशनच्या (KSBC) दुकानांमधून ही विक्री झाली आहे. ओणमच्या आदल्या दिवशी १३७ कोटी रुपयांची विक्री झाली. केरळमध्ये BEVCO ची २७८ दुकाने आणि १५५ सेल्फ सर्व्हिस स्टोअर्स आहेत.