दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते?
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्यांनी केला असून, त्यांची मूळ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटरा दौऱ्यावर हल्ला करण्याची होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगामला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि भारत दहशतवादापुढे झुकणार नाही असे जाहीर केले.