“भारत दहशतवादापुढे झुकणार नाही”; पहलगाममध्ये पोहचताच काय म्हणाले अमित शाह?
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि दहशतवाद्यांना सोडणार नाही असे जाहीर केले. जम्मू-काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. TRF या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.