पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन, अफगाणिस्तानमधील रहिवासी भागात हवाई हल्ला
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दोन दिवसांच्या संघर्षानंतर १५ ऑक्टोबरला तात्पुरता युद्धविराम झाला. मात्र, पाकिस्तानने १७ ऑक्टोबरला युद्धविरामाचं उल्लंघन करत अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले. या हल्ल्यात दोन मुलांसह सहा जण मृत्युमुखी पडले, तर १० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. तालिबान सरकारने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. दोहा येथे शनिवारी दोन्ही देशांमध्ये युद्धसमाप्तीसाठी चर्चा होणार आहे.