CJI भूषण गवईंचं फटाक्यांबाबत परखड मत; म्हणाले, “फक्त दिल्लीत का? देशभरात बंदी घाला”!
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर फटाक्यांवर देशव्यापी बंदी घालण्याबाबत सुनावणी चालू आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून फक्त दिल्लीसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशभरासाठी फटाक्यांवर बंदी घालावी, असे मत गवई यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण नियामक आयोगाला (CAQM) याबाबत भूमिका मांडण्यास नोटीस बजावली आहे.