अमेरिकेने इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त केले की नाही? ट्रम्प म्हणतात हो, पेंटॅगॉन म्हणतं नाही
गेल्या दोन आठवड्यांपासून चालू असलेलं इराण-इस्रायल युद्ध थांबून युद्धविराम जाहीर झाला आहे. अमेरिकेने इराणमधील तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आण्विक तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला, परंतु पेंटॅगॉनच्या अहवालात हा दावा फेटाळण्यात आला आहे. DIA अहवालानुसार, हल्ल्यामुळे इराणच्या आण्विक कार्यक्रमाला काही महिने विलंब झाला आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.