Video: मोदींच्या भाषणानंतर काही तासांतच ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा दावा; “मला श्रेय…”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत "जगातल्या एकाही नेत्याने मला ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती केली नाही" असे म्हटले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मध्यस्थीचा दावा केला. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात २९ वेळा मध्यस्थी केल्याचे सांगितले. राहुल गांधींनी मोदींना ट्रम्पच्या दाव्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचे आव्हान दिले. मोदींनी मात्र कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती केली नसल्याचे सांगितले.