डोनाल्ड ट्रम्प यांच्या नरमाईनंतर पंतप्रधान मोदींची त्यावर मोठी प्रतिक्रिया
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी व्यापार चर्चा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र म्हटले. यावर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांच्या विधानाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार असून व्यापार वाटाघाटीमुळे दोन्ही देशांच्या सहकार्याने अमर्याद क्षमता निर्माण होईल.