“जे स्वत:चीच कबर खोदतायत, त्यांना अडवायचं कशाला?” मोदींचा एनडीए खासदारांना प्रश्न!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील एनडीएच्या खासदारांसमोर भाषण करताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आणि काँग्रेसवर टीका केली. पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आक्रमक भूमिकेवरही त्यांनी टीकात्मक टिप्पणी केली. मोदींनी काँग्रेसच्या धोरणांवर हल्लाबोल करत, "जे स्वत:चीच कबर खोदत आहेत, त्यांना आपण अडवायचं कशाला?" असा सवाल उपस्थित केला.