“साहेब, इतिहासावर तुम्ही बोला, मला वर्तमानावर बोलायचंय”, प्रियांका गांधींनी भाजपालासुनावलं
काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरवरून सत्ताधारी भाजपा व मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदारी घेण्यास सांगितलं. प्रियांका गांधींनी २००८ मुंबई हल्ल्याच्या वेळी काँग्रेस सरकारने घेतलेल्या जबाबदारीचं उदाहरण दिलं. त्यांनी सध्याच्या गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मणिपूर, दिल्ली दंगली आणि पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला.