कसा झाला मतांचा घोटाळा? राहुल गांधींचे पुरावे; नाव भलत्याचं, मत भलत्याचं, वगळलं भलत्यानंच!
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मतदान प्रक्रियेतील घोटाळ्याचा दावा केला. त्यांनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघातील ६०१८ मतदारांची नावं वगळण्याचा प्रयत्न झाल्याचे पुरावे सादर केले. काही व्यक्तींच्या नावाने बनावट अर्ज सॉफ्टवेअरद्वारे भरले गेले. राहुल गांधींनी हे घोटाळे दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांना लक्ष्य करून काँग्रेसची मतं कमी करण्यासाठी केले असल्याचा आरोप केला.