अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: नेमकं काय घडलं असेल? वाचा काय म्हणतायत तज्ज्ञ…
अहमदाबादमध्ये १२ मे रोजी एअर इंडियाचं बोईंग ७८७ विमान कोसळलं. विमानात २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स व दोन वैमानिक होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान ६२५ फुटांवरून मेघानीनगरमध्ये कोसळलं. हवाई तज्ज्ञ अमोल यादव यांच्या मते, इंजिनमध्ये पुरेशी पॉवर निर्माण न झाल्यामुळे अपघात झाला असावा. वैमानिकांनी शेवटपर्यंत विमान वाचवण्याचे प्रयत्न केले. इंधन साठ्यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढली.