अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी भारताच्या कच्च्या तेल आयातीमुळे रशियावर दबाव निर्माण झाल्याचे विधान केले होते. यावर रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतातील रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनी अमेरिकेच्या विधानाला अयोग्य ठरवले आणि भारत-रशिया ऊर्जा सहकार्य सुरू राहील असे सांगितले.