हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर
अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लागू केल्यानंतर, व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताने रशियाकडून तेल आयात थांबवल्यास २५ टक्के टॅरिफ कमी होईल, असा दावा केला आहे. रशियाने हा दावा फेटाळून लावला. रशियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, भारताकडून मिळालेले पैसे युद्धासाठी वापरले जात नाहीत.