मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या १२०० वरून १५०० का केली? SC ची निवडणूक आयोगाला विचारणा!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगावर ईव्हीएम गैरप्रकाराचे आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीदरम्यान आयोगाला मतदारसंख्या वाढवण्याबाबत विचारणा केली आहे. आयोगाने २०१९ पासून मतदारसंख्या १५०० केली असून, यावर कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने आयोगाला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.