४८ तासांत काश्मीरमध्ये ६ दहशतवादी ठार; ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या कारवाईला यश
भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात जोरदार कारवाई सुरू ठेवली आहे. मागील ४८ तासांत त्राल आणि शोपियानमध्ये राबविलेल्या दोन मोहिमांमध्ये सहा दहशतवादी मारले गेले आहेत. सीआरपीएफ, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.