पती राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमचा पहिला फोन भावाला; म्हणाली, “दादा मला…”
इंदोरमधील नवविवाहित दाम्पत्य सोनम आणि राजा रघुवंशी चर्चेत आले आहे. मेघालयमध्ये राजा रघुवंशीची हत्या झाल्याचे समोर आले असून, सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडली आहे. मेघालय पोलिसांनी सोनमवर राजाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. सोनमच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोनमने तिच्या भावाला फोन करून मदतीची विनंती केली होती. राजा आणि सोनम यांचा विवाह एकमेकांच्या पसंतीने झाला होता.