अल्बर्ट पीडीने दिलेल्या माहितीमुळे सोनमविरोधात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती कसा लागला?
राजा आणि सोनम रघुवंशी यांचे ११ मे रोजी लग्न झाले. २० मे रोजी मधुचंद्रासाठी गेलेल्या या जोडप्याचा २३ मे पासून संपर्क तुटला. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि ९ जून रोजी सोनम पोलिसांना शरण आली. सोनमनेच राजाच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. शिलाँगच्या गाईड अल्बर्ट पीडीने दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि तीन आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला "ऑपरेशन हनिमून" असे नाव दिले आहे.