सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांनी दिली प्रेमसंबंधांची कबुली, पोलिसांची माहिती काय?
सोनम रघुवंशीने तिच्या पती राजा रघुवंशीची हत्या २३ मे रोजी शिलाँगमध्ये ट्रेक दरम्यान सुपारी किलर्सच्या मदतीने केली. सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा यांनी प्रेमसंबंधांमुळे हा कट रचला होता. या दोघांनी प्रेमसंबंधाची कबुली आता दिली आहे. २ जूनला राजाचा मृतदेह सापडला. सोनमने ८ जूनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे.