“सोनमला राजा पसंत नव्हता तर मग त्याच्याशी लग्न का केलं?”; राजाच्या आईचा सवाल
मेघालय पोलीस राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम रघुवंशीला शिलाँगला घेऊन गेले आहेत. शवविच्छेदन अहवालानुसार, राजाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने दोन वार झाले होते. सोनमला गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन क्राईम सीन रिक्रेएट केला जाणार आहे. राजाच्या आई-वडिलांनी सोनमवर आरोप केले आहेत, तर सोनमच्या आईने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तपासात सोनम राज कुशवाहाच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.