भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं? वाचा महत्त्वाचे ८ मुद्दे
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. दिल्ली एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले होते, परंतु आता हे निर्देश देशभर लागू असतील. रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कुत्र्यांचे निबिजीकरण व लसीकरण करून त्यांना सोडण्यात येईल. प्राणीप्रेमींना कुत्रे दत्तक घेण्याची परवानगी आहे. सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी होईल.